पाच राज्यांचे निकाल म्हणजे जनतेने मोदी-शहांच्या कारभाराला दिलेली चपराक – राज ठाकरे

Foto

मुंबई – नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची गेल्या चार-साडेचार वर्षांतील वागणूक देशाने पाहिली, त्यावरुन हे होणारच होते. ही जनतेने दिलेली चपराक असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  राज यांनी राहुल गांधी आणि पाच राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. देशाला राम मंदिराची नाही तर रामराज्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

राम मंदिराची गरज नाही

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरामच्या विधानसभा निवडणुक निकालावर प्रतिक्रिया देताना ही जनतेने अहंकारी राजवटीला दिलेली चपराक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पाचही राज्यातील जनतेचे आणि काँग्रेसचे यशस्वी नेतृत्व केलेल्या राहुल गांधींचे अभिनंदन केले.

फडणवीस सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातही वारे बदलत असल्याचे सांगितले. ते म्हणाले पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर राज्याला कृषीमंत्री नाही ही दुर्दैवाची बाब आहे. राज ठाकरे म्हमाले, फडणवीस सरकारला दुष्काळाचे जराही गांभीर्य नाही. राज्याला सतावणारा सर्वात मोठा प्रश्न सध्या दुष्काळ आहे. या परिस्थितीत राज्याला कृषीमंत्री नाही यापेक्षा वाईट स्थिती काय असू शकते, असा सवाल त्यांनी केला.

गुजरातच्या जनतेने मोदींच्या ऱ्हासाची सुरुवात केली

राज ठाकरे म्हणाले, गुजरातच्या जनतेचे मी आभार मानेल. कारण त्यांनी होमग्राऊंडवर मोदींना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले. २०१७ मध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनुसार भाजपला तिथे १६५ जागा मिळायला पाहिजे होत्या, त्या ९९ वर आल्या. त्यानंतर कर्नाटकच्या जनतेने त्यांना चपराक लगावली. आता या पाच राज्यातील जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. या पाचही राज्यातील जनतेचे मी अभिनंदन करतो.

राज ठाकरे म्हणाले, राम मंदिराचा मुद्दाच सध्या देशात नाही. लोकांचे आर्थिक प्रश्न अधिक मोठे आहेत. २०१९ मध्ये जनतेसमोर काय घेऊन जाणार हा प्रश्न भाजपला सतावत आहे. त्यामुळे ते भाविनिक मुद्दे उपस्थित करत आहेत. मात्र लोक आता त्यांच्या भावनेच्या प्रश्नांना भुलून मतदान करणार नाहीत, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी आता परमपुज्य  

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पु म्हणून टिंगल करणारे आता त्यांचा तसा उल्लेख करत नसल्याचे राज म्हणाले. भाजपला चिमटा काढत ते म्हणाले आता राहुल त्यांच्यासाठी परमपुज्य झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल एकटे होते, कर्नाटकमध्येही ते एकटेच होते आणि या पाच राज्यांच्या निवडणुकीतही त्यांनी एकट्यानेच भाजपच्या नेत्यांना एकट्याने तोंड दिल्याचे सांगत राहुल गांधी यांचे अभिनंदन केले. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker